सुरजागड इस्पात आणि मियाम ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने दिनाचेरपलीत ‘रोमांचक व्हॉलीबॉल स्पर्धा’

0
2

अहेरी/प्रतिनिधी

दिनाचेरपल्ली येथील स्थानिक युवकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये खेळभावना वाढवण्याच्या उद्देशाने एक उत्साही आणि रोमांचक व्हॉलीबॉल स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली.

 

सुरजागड इस्पात आणि मियाम ट्रस्ट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

युवकांना आपली प्रतिभा आणि शारीरिक क्षमता दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिक आणि व्हॉलीबॉल प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात एक खेळमय उत्साह संचारला होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. निरंजन दुर्गे (पोलीस पाटील चिंतनपेठ तथा वडलापेठ) यांनी जबाबदारी सांभाळली. तर लक्ष्मी नैताम आणि सविना पागडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अनेक मान्यवर अतिथींनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली, ज्यात रोहित तर्रेवार, रेणुका आत्राम (सरपंच), मधुकर आत्राम, महेंद्र ईष्टम, मुंडरे साहेब (ग्रामसेवक), सत्तु पेरकी आणि संतोष आत्राम यांचा समावेश होता. जय सेवा व्हॉलिबॉल मंडळाने स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

या व्हॉलीबॉल स्पर्धेमुळे युवकांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळाले. सुरजागड इसपातआणि मियाम चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक खेळांना प्रोत्साहन दिल्याबद्दल समस्त गावकरी मंडळींनी त्यांचे विशेष आभार मानले. या संयुक्त उपक्रमाने दिनाचेरपल्लीत खेळाच्या संस्कृतीला नवी दिशा दिली आहे.