मनसे चे रेल्वे इंजिन धावणार अहेरी विधानसभेत..युवा नेता संदीप कोरेत यांना मनसे तर्फे उमेदवारी जाहीर..

0
363

अहेरी:
महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवार म्हणून संदीप कोरेत यांची आज घोषणा करण्यात आली आहे.मनसे तर्फे घोषित करण्यात आलेल्या यादीत गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेसाठी संदीप कोरेत यांच्या नावाचा समावेश आहे.


संदीप कोरेत यांनी मुंबई येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन अहेरी विधानसभा क्षेत्रा विषयी सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
मनसे तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आल्याने जास्तीत जास्त जागा लढविण्यावर मनसे चा भर आहे.
संदीप कोरेत यांच्या प्रचारासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आवाज या क्षेत्रात घुमण्याची शक्यता आहे.