अहेरी:
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विविध प्रमुख चौकांमध्ये पक्षाच्या फलकांचे अनावरण करण्यात आले. आलापल्ली शहरात प्रथमच अशा स्वरूपात पक्षाचे फलक लावण्यात आल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच युवा सेनाप्रमुख आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दिलीप भाऊ सुरपाम यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी पक्षाच्या फलकांचे अनावरण करण्यात आले.
आलापल्ली शहर व परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि जनसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
फलक अनावरण कार्यक्रमाला विभागप्रमुख सचिन सलामे,आकाश तुमडे ,संजय फुलोर,राकेश आत्राम,सागर गोंगले तिरुपती रामगिरवार ,व्यंकटेश बंदूकवार,विजय वानखेडे वसंत आलाम आदी.
शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




