🎬 हिंदी चित्रपटसृष्टीतील माझे एकमेव आणि एकमेव आवडते अभिनेते — राजकुमार साहेब! ❤️८ ऑक्टोबर २०२६ रोजी राजकुमार साहेब यांच्या जन्माला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या जन्मशताब्दीच्या या विशेष निमित्ताने, त्यांच्या एका निस्सीम चाहत्याकडून ही शब्दरूपी विनम्र आदरांजली…!
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक महान अभिनेते होऊन गेले. प्रत्येकाची अभिनयशैली वेगळी, प्रत्येकाची लोकप्रियता वेगळी; परंतु राजकुमार साहेबांचे व्यक्तिमत्त्व मात्र अगदी स्वतंत्र, वैशिष्ट्यपूर्ण आणि अविस्मरणीय होते.त्यांचा तो भारदस्त आवाज, संवाद बोलण्याची ती खास रुबाबदार ढब, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, डोळ्यांतील ती जरब, मर्दानी चालण्याची लकब आणि प्रत्येक संवादातून जाणवणारा तो राजेशाही रुबाब… या सर्व गोष्टींनी माझ्या मनावर कायमस्वरूपी अधिराज्य गाजवले आहे.
मी राजकुमार साहेबांचा केवळ चाहता नाही, तर त्यांचा एक Ardent Fan — निस्सीम चाहता आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील माझे ते ONLY ONE & ONLY ONE आवडते अभिनेते आहेत!
🎬 पडद्यावरची एंट्री आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट!राजकुमार साहेबांचे चित्रपटगृहातील पडद्यावर आगमन हा माझ्यासाठी नेहमीच एक अविस्मरणीय अनुभव राहिला आहे.विशेषतः त्यांच्या पांढऱ्या बुटांतील रुबाबदार एंट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले जायचे. त्यांच्या पडद्यावरील आगमनासोबतच चित्रपटगृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट घुमत असल्याचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे.त्यांची मर्दानी चाल, हातातील तंबाखूचा पाइप किंवा चिरूट, त्यांची देहबोली आणि संवादफेक यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष आपोआप त्यांच्याकडे खेचले जायचे.ते केवळ संवाद बोलत नव्हते, तर प्रत्येक संवादाला स्वतःची एक वेगळी ओळख आणि खास रुबाब देत होते!त्यांच्या अभिनयाचे आकर्षण केवळ संवादांपुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांतील जरब, देहबोली आणि पडद्यावरील प्रभावी उपस्थिती यांचाही त्यात मोठा वाटा होता.राजकुमार साहेबांची खरी जादू म्हणजे त्यांची नक्कल करता येऊ शकते; पण त्यांच्यासारखे होणे मात्र सोपे नाही!
🌺 जन्मशताब्दी — एका महान कलाकाराला शब्दरूपी सलाम!८ ऑक्टोबर १९२६ रोजी जन्मलेल्या राजकुमार साहेबांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली. ३ जुलै १९९६ रोजी त्यांचे निधन झाले; मात्र त्यांच्या चित्रपटांमधून, अभिनयातून आणि अजरामर संवादांमधून ते आजही असंख्य चाहत्यांच्या स्मरणात जिवंत आहेत.त्यांच्या जन्माला १०० वर्षे पूर्ण होत असताना, त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनातील जुन्या आठवणी आजही ताज्यातवान्या आहेत. या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळत आहे.त्यांचे चित्रपट पाहताना, त्यांचे संवाद ऐकताना आणि त्यांच्या अभिनयाचा आनंद घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—काळ बदलतो, पिढ्या बदलतात; पण खऱ्या कलावंताची कला काळाच्या पलीकडे जाऊन सदैव जिवंत राहते!
❤️ राजकुमार साहेबांच्या प्रेमापोटी मित्रांसोबत पाहिलेले चित्रपट आणि कर्जाच्या अविस्मरणीय आठवणी!राजकुमार साहेबांवरील माझे प्रेम आणि त्यांच्याबद्दलचे आकर्षण इतके विलक्षण होते की, त्या काळात मी विक्रीकर विभागातील तसेच इतर क्षेत्रांतील माझ्या असंख्य मित्रपरिवाराला राजकुमार साहेबांचे अनेक चित्रपट चक्क कर्ज काढून दाखविलेले आहेत!चित्रपट दाखविण्यासाठी घेतलेले ते कर्ज नंतर मी वर्षभर फेडत असे. मात्र, त्या चित्रपटांमधून मिळालेला आनंद आणि मित्रपरिवारासोबत घालवलेले ते क्षण माझ्यासाठी अनमोल होते.त्याच प्रेमळ आठवणींमुळे माझे जुने मित्र आजही मला अतिशय आनंदाने आणि हर्षोल्हासाने “जानी” या टोपणनावाने हाक मारतात.त्यांची ती हाक ऐकताच मीही त्यांना तेवढ्याच जोषात, आनंदात आणि मनस्वीपणे प्रतिसाद देतो. त्यानंतर आमचा आनंद द्विगुणित होतो आणि तो आनंद अक्षरशः गगनात मावेनासा होतो!राजकुमार साहेबांवरील माझ्या निस्सीम प्रेमाने मला मित्रपरिवारात मिळवून दिलेली ही खास ओळख आजही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
🌹 राजकुमार साहेबांची प्रत्यक्ष भेट — माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय ठेवा!राजकुमार साहेबांवरील माझ्या निस्सीम प्रेमामुळे मला त्यांच्या प्रत्यक्ष भेटींचा अविस्मरणीय योगही लाभला.सन १९९४ ते जून १९९६ या कालावधीत मी त्यांच्या वरळी येथील निवासस्थानी एकूण पाच वेळा सदिच्छा भेट घेतली होती. त्यापैकी दोन वेळा त्यांच्या वाढदिवसानिमित्त, तर अन्य तीन वेळा वेगवेगळ्या दिवशी त्यांची भेट घेण्याचे भाग्य मला लाभले.या भेटी माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंददायी आणि मोलाच्या आठवणी आहेत.यातील एक प्रसंग तर माझ्या आयुष्यातील अत्यंत खास आणि अविस्मरणीय आहे.एकदा राजकुमार साहेबांनी मला त्यांच्या वरळी येथील निवास स्थानापासून स्वतःच्या जर्मन बनावटीच्या फोक्सवॅगन (Volkswagen) कारने कलानगर, वांद्रे (पूर्व), येथे सोडले होते. त्यानंतर ते पुढे गोरेगाव येथील फिल्म सिटीच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर मी लगेचच कलानगरहून बस पकडून पुन्हा राजकुमार यांच्या बंगल्यावर गेलो आणि तेथे माझी पार्क केलेली बजाज सुपर स्कुटर घेवून पुन्हा वांद्रे (पुर्व) येथील माझ्या शासकीय निवासस्थानी घरी परत आलो.
हिंदी चित्रपटसृष्टीतील माझ्या सर्वाधिक आवडत्या अभिनेत्याने स्वतःच्या कारमधून मला सोडले, हा प्रसंग माझ्यासाठी शब्दांत व्यक्त न करता येणारा परमोच्च आनंदाचा क्षण होता.राजकुमार साहेबांसोबतचा तो प्रवास म्हणजे माझ्या आयुष्यभराचा अमूल्य ठेवा आणि कधीही विसरता न येणारी आठवण आहे! ❤️त्यांच्या प्रत्यक्ष भेटींच्या त्या आठवणी आजही माझ्या मनात तितक्याच ताज्या आहेत.
🎬 राजकुमार साहेबांचे अजरामर आणि गाजलेले काही निवडक संवाद!राजकुमार साहेबांच्या अभिनयाची खरी ओळख म्हणजे त्यांची संवादफेक! त्यांचे अनेक संवाद आजही चाहत्यांच्या ओठांवर आहेत. त्यांपैकी माझ्या विशेष आवडीचे काही निवडक संवाद पुढीलप्रमाणे—१. चित्रपट — बुलंदी“हमको मिटा सके,ये जमाने में दम नहीं,जमाना हमसे है,जमाने से हम नहीं!”२. चित्रपट — वक्त“चिनॉय सेठ, जिनके अपने घर शीशे के हों, वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते।”३. चित्रपट — बुलंदी“खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले,खुदा बंदे से खुद पूछे,बता तेरी रज़ा क्या है।”४. चित्रपट — तिरंगा“गेंडा स्वामी, तिरंगा के खिलाफ तुमने कोई भी कदम उठाया, तो हम तुम्हें वो मौत देंगे, ना किसी कानून में लिखी होगी और ना किसी मुजरिम ने सोची होगी।”५. चित्रपट — मरते दम तक“दादा तो इस दुनिया में सिर्फ दो हैं। एक ऊपरवाला और दूसरे हम।”६. चित्रपट — मरते दम तक“जब मौत नज़दीक आती है, तो लोग यमराज के साथ-साथ राणा को भी याद कर लेते हैं।”हे संवाद ऐकताना आजही अंगावर रोमांच उभे राहतात. त्यांच्या आवाजातील भारदस्तपणा, शब्दांमधील धार आणि संवादफेकीतील तो अनोखा रुबाब यामुळे हे संवाद माझ्या स्मरणात कायमचे कोरले गेले आहेत.
🌹 एका निस्सीम चाहत्याकडून जन्मशताब्दीच्या हार्दिक शुभेच्छा!राजकुमार साहेब हे माझ्यासाठी केवळ एक महान अभिनेते नव्हते, तर माझ्या आयुष्यातील आनंदाच्या असंख्य आठवणींशी जोडलेले एक अढळ व्यक्तिमत्त्व आहेत.त्यांचे चित्रपट, त्यांचे संवाद, त्यांची रुबाबदार शैली, त्यांच्यासोबतच्या माझ्या प्रत्यक्ष भेटी आणि मित्रपरिवारात मला मिळालेले “जानी” हे प्रेमळ टोपणनाव — या सर्व आठवणी माझ्या आयुष्याचा एक अनमोल भाग आहेत.राजकुमार साहेब, तुम्ही आज आमच्यात प्रत्यक्ष नसाल; पण तुमचा आवाज, तुमचे संवाद, तुमची अभिनयशैली आणि तुमच्या असंख्य आठवणी आमच्या मनात सदैव जिवंत राहतील!हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव “बेताज बादशहा” म्हणून ओळखले जाणारे राजकुमार (जानी) यांनी आपल्या अद्वितीय आणि बेजोड अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेल्या या महान कलाकारास त्यांच्या १०० व्या जन्मशताब्दीनिमित्त एका निस्सीम चाहत्याकडून कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन!
🌹🌹🌹 जानी… जानी… जानी…! 🌹🌹🌹❤️ राजकुमार साहेब — माझे एकमेव आणि एकमेव आवडते अभिनेते! ❤️🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
प्रसिद्धी पत्रक सादरकर्ता :-
श्री. वसंत शामराव उटीकर,राजकुमार साहेब (जानी) यांचा
एक निस्सीम चाहता
(Ardent Fan)भायखळा, मुंबई – ४०० ०२७.भ्रमणध्वनी : ९३२४५६१५९१.ईमेल – vasantutikar@gmail.com




