आलापल्ली वनपरिक्षेत्रात वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी प्रकरण: १३ आरोपींना ,१३ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

0
6
Oplus_16908288

अहेरी:

आलापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सिरोंचा रोडवरील नाग मंदिराच्या परिसरात वन्यजीवांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा वनविभागाने नुकताच पर्दाफाश केला होता.या प्रकरणात जिवंत खवल्या मांजर, वाघाचे सुळे दात आणि हाडे जप्त करण्यात आली असून तब्बल १३ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. अहेरी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी सर्व आरोपींना १३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावली आहे.

काय आहे घटना?

वनविभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आलापल्ली ते सिरोंचा मार्गावरील नाग मंदिरा जवळ सापळा रचून कारवाई करण्यात आली. २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ७.०० ते ११.०० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. रामगुंडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत आरोपींकडून वन्यजीव व त्यांचे अवयव जप्त करण्यात आले.

वनविभागाने कारवाई दरम्यान खालील साहित्य व वन्यजीव जप्त केले आहेत१ मोठी जिवंत खवल्या मांजर,१ जिवंत खवल्या मांजरीचे पिल्लू,वाघाचे १ नख,वाघाची ४४ हाडे,वाघाचे २ सुळे दात,३ दुचाकी वाहने

अटक करण्यात आलेले आरोपी:

वनविभागाने या प्रकरणात वेगवेगळ्या तारखांना कारवाई करत १३ आरोपींना ताब्यात घेतले. १. चंदन बापुजी भोयर (वय ५३, रा. कोनसरी, जि. गडचिरोली) २. संजय पुल्ला पोरतेट (वय ४०, रा. झिमेला, जि. गडचिरोली) ३. वासुदेव बिरसु मडावी (वय २३, रा. कोकाबंडा, जि. गडचिरोली) ४. महेश मुसली सडमेक (वय ३२, रा. आलापल्ली, जि. गडचिरोली) ५. गजानन गणपत सिडाम (वय ३२, रा. झिमेला, जि. गडचिरोली) ६. कालीचरण जयराम मडावी (वय ४६, रा. गोमणी टोला, जि. गडचिरोली) ७. राकेश बाबुराव पेगडपल्ली (वय ३०, रा. डुम्मे, ता. एटापल्ली) ८. बापुजी पाटाळी पुंगाटी (वय ४२, रा. डुम्मे, ता. एटापल्ली) ९. सुधाकर डोलु पुंगाटी (वय २०, रा. कोकाबंडा, ता. मुलचेरा) १०. दिलीप माधव आत्राम (वय ४१, रा. झिमेला, ता. अहेरी) ११. रामा दल्लु गावडे (वय ३०, रा. वासामुंडी, ता. एटापल्ली) १२. सुभाष गणपत सिडाम (वय ३१, रा. झिमेला, ता. अहेरी) १३. सुधाकर चंद्रशाही कोरेत (वय ४८, रा. आलापल्ली, ता. अहेरी)

कायद्यानुसार कारवाई:

या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम २, ९, ३९, ४४, ४८(A), ४९, ५०, ५१, ५२ आणि भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६(१) I, ५२ अंतर्गत वनगुन्हा क्रमांक ०८१२०/२०२९८६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. रामगुंडेवार यांनी सर्व १३ आरोपींना अहेरी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एच. पांचाळ यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व बाबी लक्षात घेऊन आरोपींना १३ऑक्टोबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वनविभाग या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे.